ऑनलाइन नवीन एलपीजी कनेक्शन

नवीन एलपीजी कनेक्शन आता मागणीनुसार देशभरात उपलब्ध आहेत. जर तुमच्या घरी कोणत्याही पीएसयू तेल कंपनीचे एपीजी कनेक्शन नसेल आणि तुमच्या घरात स्वयंपाकासाठी स्वतंत्र जागा असेल, तर तुम्ही तुमच्या घरात घरगुती कनेक्शन घेऊ शकता. घरगुती कनेक्शनसाठी, तुम्ही तुमच्या क्षेत्रात सेवा देणाऱ्या जवळच्या वितरकाची भेट घेऊन कनेक्शनसाठी ओळखीचा वैध पुरावा आणि जिथे कनेक्शन पाहीजे असेल त्या पत्त्याच्या वैध पुरावा देवून नोंदणी करू शकता.

तुम्ही आता मोबाईल अॅप आणि पोर्टलवरून देखील नवीन कनेक्शनसाठी अर्ज करू शकता. मोबाईल अॅप Following apps of oil marketing companies can be used to apply for an एलपीजी connection online. and portal Following websites of oil marketing companies can be used to apply for an एलपीजी connection online. also.

निवासस्थानाचा पुरावा म्हणून खालीलपैकी एक दस्तऐवज सादर करता येईल: -

  1. आधार (यूआयडी)
  2. बाहन चालक परवाना
  3. लीज अग्रीमेंट
  4. मतदार ओळखपत्र
  5. शिधापत्रिका
  6. टेलिफोन/वीज/पाणी बिल
  7. पारपत्र
  8. राजपत्रित अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले स्व-घोषणापत्र
  9. फ्लॅट वाटप / ताबा पत्र
  10. घर नोंदणी दस्तऐवज
  11. एलआईसी पॉलिसी
  12. बैंक/क्रेडिट कार्ड स्टेटमेंट

कनेक्शन मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे:

  1. आधार (यूआयडी)
  2. पारपत्र
  3. पैन कार्ड क्रमांक
  4. मतदार ओळखपत्र
  5. केंद्र/राज्याद्वारे जारी केलेले ओळखपत्र
  6. बाहन चालक परवाना

पूरक साधन/ सुरक्षा ठेव:

नोंदणी आणि पुनरावृत्ती दूर केल्यावर, वितरक तुम्हाला एसएमएस/ई-मेलद्वारे सूचना पाठवेल. कनेक्शन मिळवण्यासाठी तुम्ही वितरकाशी संपर्क साधू शकता.

तुम्हाला ताबडतोब एलपीजी कनेक्शन देण्यात येईल. तथापि, एलपीजी कनेक्शन देण्यापूर्वी, तुमच्याकडे आयएस:४२४६ प्रमाणीत आयएसआय मार्क हॉटप्लेट आणि आयएस:९५७३ (टाइप IV) प्रमाणीत सुरक्षा एलपीजी नळी असावी, जेणेकरून तुमचे इंडेन कनेक्शन मंजुन केल्यानंतर, आपल्या निवासस्थानी त्वरित संचमांडणी करता येईल. तुम्हाला एलपीजी कनेक्शन देण्यापूर्वी, तुम्हाला खालील दरांवर सुरक्षा ठेव भरावी लागेल:

राज्य सिलेंडर प्रेशर रेग्युलेटर
अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि मणिपूर ही ईशान्य राज्ये १४.२ किलो सिलेंडरसाठी रु.2000/-
Rs ५ किलो सिलेंडरसाठी रु.1150/-
रु. 200/-
उर्वरित भारत १४.२ किलो सिलेंडरसाठी रु.2200/-
५ किलो सिलेंडरसाठी रु.1150/-
रु. 250/-